Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»राजकारण»सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, साधेपणात शपथविधी संपन्न
राजकारण

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, साधेपणात शपथविधी संपन्न

Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comJanuary 31, 2026Updated:July 25, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
sunitra Pawar
Sunetra Pawar Takes Oath as Deputy Chief Minister in a Simple Ceremony
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही शोककळा पसरली आहे. अशा कठीण प्रसंगी पक्षाने महत्त्वाचा आणि तातडीचा निर्णय घेत पुढील नेतृत्व निश्चित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. या निवडीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा मुंबईतील Lok Bhavan येथील दरबार हॉलमध्ये अतिशय साधेपणाने पार पडला. मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल Acharya Devvrat यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामती येथून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. शनिवारी सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली.

यानंतर धनंनजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि संजय बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची Varsha Bungalow येथे भेट घेतली. गटनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यानंतर हे पत्र मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आले आणि पुढील घटनाक्रम वेगाने पूर्ण झाला.
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली ही मोठी जबाबदारी राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू करणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) ‘दोन वाघिणी’ प्रचारसभेत जोरदार हल्लाबोल
Next Article पंकज पवार ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारने’ सन्मानित
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
पिंपरी चिंचवड

संघर्ष संस्था तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

February 28, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202680 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202680 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.