राजकारण

माधुरी मुटकेंसाठी शिवसेना आमदार शरद सोनवने मैदानात!

प्रभाग क्रमांक 08 मध्ये शिंदे गटाच्या दमदार एंट्रीमुळे निवडणूक रंगात, तिहेरी लढतीने राजकीय समीकरणे बदलली.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 08 सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुरुवातीला ही निवडणूक थेट दोन बलाढ्य पॅनलमध्येच रंगणार, अशी चर्चा होती. एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सक्षम आणि ताकदवान पॅनल उभे केल्याने लढत अटीतटीची होईल, असे चित्र होते. मात्र आता या लढतीत शिवसेना (शिंदे गट) देखील जोरदारपणे उतरल्याने प्रभाग क्रमांक 08 मधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे निलेश मुटके यांनी “या लढतीत आम्हीही ताकदीने आहोत,” अशी गर्जना करत निवडणूक वातावरण अधिक तापवले आहे. निलेश मुटके यांनी 2017 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती. यंदाही त्यांनी धनुष्यबाण या चिन्हालाच कायम ठेवत आपल्या पत्नी माधुरी मुटके यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे प्रभागात शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर 03 डिसेंबर 2025 रोजी साधुराम गार्डन मंगलकार्याल येथे भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. संपूर्ण कार्यालय आणि परिसर भगवामय झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, घोषणाबाजी आणि जोशपूर्ण वातावरण यामुळे मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी शरद सोनवणे म्हणाले की, “हि निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, त्यामुळे माधुरी निलेश मुटके या प्रभाग 08 मधून १००% विजयी होणार.” पुढे ते म्हणाले “त्यांना पैसे वाटू द्या. आपण मते मागा, आपल्याला जनता न्याय देईल”

आता प्रभाग क्रमांक 08 मध्ये कमळाच्या पाकळ्या, घड्याळाचे काटे आणि धनुष्यबाण यांच्यात खरी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. तिहेरी लढतीमुळे मतांचे विभाजन होणार का, की एखादा पक्ष स्पष्ट आघाडी घेणार, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल. एकूणच प्रभाग क्रमांक 08 मधील ही निवडणूक महापालिकेच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…
महिला सफाई कर्मचाऱ्यांवर नाईट शिफ्ट लादली; महापालिकेचा निर्णय वादात!
प्रभाग क्र. ०२ मध्ये बुद्धविहारावरून बौद्ध समाज आक्रमक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button