महाराष्ट्र

पंकज पवार ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारने’ सन्मानित

समाजसेवा व अध्यात्मातील कार्याबद्दल पंकजभाऊ पवार यांचा सन्मान

समाजहित, अध्यात्म आणि सेवा कार्याचा त्रिवेणी संगम जपणारे पंकजभाऊ पवार यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू व माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी सिन्नर येथे केले होते. कार्यक्रमास विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंकजभाऊ पवार यांना हा पुरस्कार त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. पंकज पवार हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मोशी (पुणे) येथे स्वामी सेवेसाठी कार्यरत असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते श्रद्धा, सेवा व संस्कार यांचा संगम साधत समाजासाठी योगदान देत आहेत. स्वामी सेवेतून त्यांनी अनेक गरजू, अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मानसिक आधार, मार्गदर्शन व प्रेरणा दिली आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता निर्माण करणे, युवकांना योग्य दिशा देणे, तसेच सामाजिक बांधिलकी जपणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्यामुळे समाजात त्यांचा वेगळा आदरस्थान निर्माण झाला आहे.

पुरस्कार स्वीकारताना पंकजभाऊ पवार यांनी संजीवनी फाउंडेशन, उपस्थित मान्यवर तसेच स्वामी समर्थ भक्तगणांचे आभार मानले. “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून स्वामी सेवेत सहभागी असलेल्या प्रत्येक सेवकाचा आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या पुरस्कार सोहळ्यामुळे सिन्नर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पंकजभाऊ पवार यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा…

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, साधेपणात शपथविधी संपन्न 
पिंपरी-चिंचवड प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) ‘दोन वाघिणी’ प्रचारसभेत जोरदार हल्लाबोल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button